श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावलीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या चिमडा नदीचा पुलाजवळ दुचाकी व चार चाकी मध्ये अपघात होऊन त्यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 25 ला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडलेली आहे.
सावली तालुक्यातील रुद्रापूर येथील शुभम नीलकंठ नरुले वय 22 वर्ष असे या दुचाकीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असल्याचे कळते आहे. तो मूल वरून सावली कडे येत असतानाच गडचिरोली वरून चंद्रपूर कडे जाणाऱ्या चार चाकी शिफ्ट गाडीने त्याला उडविले त्यात त्याच्या जागीच मृत्यू झाला असून सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.