गिरगांव येतील आदिवासी लोकनाट्य मंडळाला हार्मोनियम (संगित पेटी) भेट.

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

खेड्या भागातील कलाकारांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा,संगित क्षेत्रात कलाकार समोर जावे यासाठी काँग्रेस नेते विनोदभाऊ बोरकर तसेच गिरगाव ग्रा.पं.चे उपसरपंच शरदराव सोनवाने यांच्या संयुक्त विद्यमाने व पुढाकाराने नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील आदिवासी लोकनाट्य मंडळाला हार्मोनियम (संगित पेटी) भेट देण्यात आली. यावेळी सरपंच प्रशांत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य राकेश खोब्रागडे, पोलीस पाटील जीवन बोरकर, अविनाश राऊत आदीची प्रामुख्याने उपस्थित होते.सर्व मंडळातील सभासदांनी त्यांचे आभार मानले.
यावेळेस मंडळचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.