समृध्द महाराष्ट्र क्रेडिट को. ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर 

नगाभिड: तालुक्यातील समृध्द महाराष्ट्र क्रेडिट को. ऑप. सोसायटी तळोदी (बा.) रजी. नं. १२६/२०१८ ची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार (दी.२४) ला साई मंदिर तळोदी येथे १२.०० वाजता पार पडली.

राजकुमार चींदुजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी उपस्थित संस्थेच्या सभासदांना अध्यक्षांनी सन २०२१-२२ वर्षातील जमा खर्च, नफा-तोटा पत्रक वाचून दाखविले. व सभेतील सर्व विषयावर सर्वासमक्ष चर्चा करण्यात आली व सभेतील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. व सोसायटीच्या सर्व सभासदाच्या हिताचा विचार करून सोसायटीच्या आर्थिक प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मत अध्यक्षांनी व्यक्त केले.

यावेळी सभेला सोसायटीचे उपाध्यक्ष नंदू झोडे, संचालक देवेंद्र गेडाम, आशिष मोहुर्ले, धनराज रामटेके, प्रवीण गावंडे, विजया रामटेके, खुशाल मेश्राम, भगवान देशमुख, व्यवस्थापक वंदना पराते, कर्मचारी शैलेश देशमुख व असंख्य सभासद उपस्थित होते.