श्री.विलास ढोरे प्रतिनिधी न्यूज जागर , वडसा
प्रेस नोट
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (PM SVANidhi) अंतर्गत“अर्ज स्विकृती विशेष शिबीर”*
नगर परिषद देसाईगंज क्षेत्रातील सर्व पथविक्रेत्यांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, नगर पथविक्रेते अनौपचारीक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. नगरवासीयांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता सुनिश्चीत करण्यात महत्वपुर्ण भुमीका बजावतात . कोवीड -19 (साथीचा रोग) सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिवीकेवर विपरीत परिणाम केलेला आहे. बहुदा हे कमी भांडवलावर काम करतात आणि जे काही भांडवल त्यांच्याकडे होते तेही या टाळेबंदीच्या काळात शिल्लक राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता असल्याने त्यांचेकरीता शासनामार्फत 100 टक्के केंद्र शासन पुरस्कृत “प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (PM SVANidhi ) या योजनेची अंमलबजावणी देसाईगंज नगर परिषद क्षेत्रात करण्यात येत असुन, या योजनेअंतर्गत शहरातील पथविक्रेत्यांना प्रथम रुपये 10000/- व दुसऱ्यांदा रुपये 20000/- तसेच तिसऱ्यांदा रुपये 50000/- असे बँकामार्फत कर्ज स्वरुपात खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात येत असते.
शासनाचे वतीने दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर 2022 चे कालावधीत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे . याचे औचित्य साधुन देसाईगंज शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना लाभ व्हावा याकरीता दिनांक 30/09/2022 रोज शुक्रवारला कर्ज मिळण्याकरीता अर्ज स्विकृती संबंधाने नगर परिषद देसाईगंज येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील पात्र पथविक्रेत्यांनी या विशेष शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी केले आहे .
अर्ज सादर करतांना पथविक्रेत्यांनी खालिल कागदपत्रे सोबत घेऊन यावे.
1.अर्जदाराचे आधार कार्ड – मोबाईल क्रमांक. संलग्न बंधनकारक
2. मतदार ओळखपत्र झेराक्स 3.राशनकार्ड झेराक्स 4. पासपोर्ट फोटो
5.व्यवसायाचे फोटो