भामरागड तालुक्यातील 4 ग्रा.पं मध्ये सार्वत्रिक निवडणूक

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

भामरागड तालुक्यातील 4 ग्रा.पं मध्ये सार्वत्रिक निवडणूक. 4 ग्रा.पं मधील निवडणूकीत 32 सदस्या करीता 66उमेदवारांनी नामांकन अर्ज भरण्यात आले, तर 4 सरपंच पदासाठी 12 उमेदवारांनी आपले
नामांकन अर्ज भरले आहेत.आज अर्ज छानणीत एकाची उमेदवारी अवैद्य ठरल्याने 65 उमेदवार ग्रा.पं सदस्या करीता तर सरपंच पदाकरीता 12 उमेदवारी कायम आहेत.

भामरागडतालुक्यात मन्नेराजारम,येचली, मिरगुळवंचा व लाहेरी या चार ग्रा.पं सार्वत्रिक निवडणूक होत आहे. नामांकन अर्ज भरण्याची अंतिम दिवस 27 /9/2022 पर्यंत होता. मन्नेराजारम ग्रा.पं मध्ये 9 सदस्या साठी 25 अर्ज प्राप्त झाले.सरपंच पदाकरीता 3 उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते.सर्वच वैद्य ठरले.मिरगुळवंचा ग्रा.पं मध्ये 9 सदस्या साठी 14अर्ज भरले, सरपंच पदा करीता 4 अर्ज भरण्यात आले.तेसुद्धा कायम आहेत.लाहेरी ग्रा.पं मध्ये 7 सदस्या करीता 21अर्ज भरले तर सरपंच साठी 3 अर्ज भरण्यात आले होते, त्यापैकी एकाची उमेदवारी अवैद्य ठरल्याने 20 उमेदवार कायम राहणार असुन सरपंच पदाकरीता 3 ही कायम आहेत.येचली ग्रा.पं.मध्ये 7 सदस्या असलेल्या ग्रा.पं.केवळ 6 उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले तर सरपंच साठी 2 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज कायम आहे. दि. 30/9/2022 रोज शनिवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असुन कोणी मागे घेणार की नाही यानंतर अंतिम निवडणूक लढविणारांची यादी जाहीर करणार आहेत.

भामरागड तालुक्यात होत असलेल्या चार ग्रा.पं मध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे 32 सदस्यासाठी 66 तर 4 सरपंच पदाकरीता 12 एकुण 78 अर्ज प्रप्त झाले होते.आज छानणीत सदस्या करीता भरलेला एकाची अवैध ठरल्याने सदस्यासाठी 65 तर सरपंच साठी 12 उमेदवारांना वैद्यरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली.सदर निवडणूक अधिकारी भामरागडचे तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या देखीरेखीत मन्नेराजारम ग्रा पं च्या निवडनूक निर्णय अधिकारी म्हणून पं.वि.अ.व्ही.जे देव्हारे,येचली ग्रा.पं.च्या पं.वि.क्रु.पी.आर.श्रीरामे,मिरगुळवंचा ग्र.पं.च्या क.प्र.अ.आर.आर.शेरकुरे,लाहेरी ग्रा.पं च्या वि.अ.सां.जे.व्ही .मेश्राम यांनी निवडणूक अर्ज स्वीकारण्याचे व छाणणी प्रक्रिया पार पाडले.