श्री अरुण बारसागडे , चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
सावरगाव /- क्रीडा क्षेत्रात आपल्या गावातील युवकांना उंच भरारी घेता यावा त्यांच्या कौशल्याना योग्य ती दिशा आणि योग्य वळण देता यावे, त्यांना क्रीडा क्षेत्रात कधीही मागे राहता येऊ नये यासाठी बरीच दिवसापासून झाडबोरी येथील तरुण युवकांनी मा. श्री. विनोदभाऊ बोरकर यांना व्हॉलीबॉल ची मागणी केली असता कुठलाही विचार न करता मा. विनोदभाऊ बोरकर यांनी नागभीड तालुक्यातील झाडबोरी येथील तरुणांना व्हॉलीबाल संच भेट देण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित श्री.विनोदभाऊ बोरकर अध्यक्ष श्रीलक्ष्मी पतसंस्था,प्रशांत गायकवाड सरपंच,सुधीर बोरकर ,सोशल मीडिया प्रमुख नागभीड नबी शेख , जावेद शेख, आलम शेख , प्रकाश झोडे, हबीब शेख, हसीम सय्यद तसेच युवा आणि जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.