चामोर्शी तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर
चामोर्शी:– राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा द्वारा सत्र सप्टेंबर २०२२ मध्ये आयोजित राष्ट्रभाषा परीक्षा स्थानिक जा. कृ. बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात नुकतीच घेण्यात आली.यात राष्ट्रभाषा शुध्दसुलेखन, प्राथमिक,प्रारंभिक, प्रवेश,कोवीद, रत्न इत्यादी परीक्षांचा समावेश होता. यात एकूण १५५ विदयार्थी उपस्थित होते. या परीक्षेसाठी बोमनवार विद्यालय, विश्वशांती विद्यालय भेंडाळा, शहिद बाबूराव शेडमाके विद्यालय आमगाव, या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले.
केंद्र व्यवस्थापक म्हणून प्र. प्राचार्य- इतेंद्र चांदेकर तर, परीक्षा निरीक्षक म्हणून श्री- घनश्याम मनबतुलवार सर , श्री- मनोज बोमनवार, रूचिता बंडावार,सौ. पोळशेट्टीवार मॅडम यांनी काम पाहिले.
या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी हिंदी भाषा प्रचारक- श्री- घनश्याम मनबतुलवार यांनी परिश्रम घेतले. शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सहकार्य केले.