जिल्हा प्रतिनिधी न्युज जागर गडचिरोली
गडचिरोली – गोंडवाना साम्राज्याची विरांगणा सम्राज्ञी दुर्गावती यांच्या चारशे अठ्याण्णव व्या जयंतीनिमित्त धानोरा रोड गडचिरोली येथे अभिवादन करण्यात आले.महाराणी दुर्गावती ह्या महाराजा किरतसिंग चंदेल यांच्या सुपूत्री होत्या त्यांचा विवाह महाराजा दलपतशहा मडावी यांचे सोबत झाला. पतीनिधनानंतर खचून न जाता पाच वर्षाच्या वीर नारायण या आपल्या मुलास गादीवर बसवून तिने मुघलांना सळो की पळो करून सोडले. चलनात सुवर्ण मुद्रा बाळगणारे तिचे राज्य सुखी समृध्द होते 1564 ला तिला वीर मरण आले.मा.आनंदरावजी कंगाले साहेब यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. सुधीर मसराम, सोनु दादा अलाम, आरतीताई कंगाले, बबिता उसेंडी, मालती पुडो, सुभद्रा कोकोडे, रज्जु आत्राम, तुलसीदास मसराम, रामचंद्र गोटा, विलासराव गेडाम, भांडेकरजी, पेंदाम सर, देवराव कोवे, भाष्कर भाऊ आत्राम, व अनेक सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.