श्री.नंदकिशोर वैरागडे प्रतिनिधि कोरची
मुखालयापासुन ४ कि.मी.अंतरावर कोसमी ते बेडगांव राष्ट्रीय महामार्गावर (वाळदे बोडी) जवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विलास अमरू मडावी वय (२६ )वर्ष राहणार कोसमी या इसमाचा जागीच मृत्यू झाला.
प्राप्त माहिती नुसार विलास मडावी हा इसम आपल्या मित्रा सोबत कोसमी येथून जेवन करून बेडगांव येथे रात्रो कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या मित्रा सोबत गेला होता. कार्यक्रम पाहून वापस स्वगावी गावी पायदळ येत असताना ( वाळदे बोडी )जवळ रोडवरती झोपुन असतांना कोरची मार्गाने चार चाकी वाहन भरधाव वेगाने येऊन त्याच्या अंगावरून गाडी चालवली त्यामुळे.त्याचा जागीच मृत्यू झाला.त्यांची माहिती बेडगांव पोलिस स्टेशनला दिली त्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला
त्या नंतर सकाळी कोरची येथे ग्रामीण रुग्णालयात नेवुन पी.ए.करण्यात आले. त्या नातेवाईकाडे प्रेत देण्यात आले कोरची पोलीस स्टेशन मध्येगुन्हा नोंद करण्यात आला.त्यांचा पुढील तपास ठाणेदार करीत आहेत.त्याच्या पश्चात पत्नी,मुलगी,आई,वडील,भाऊ, असा आप्तपरिवार आहे.तो मनमिळावू प्रेमळ होता. त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
कोसमी येथील स्मशानभुमी वरती अंत्यसंस्कार करण्यात आले.