जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर गडचिरोली
गडचिरोली : येथील शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या इमारतीत सुरु असेलेल्या एकलव्य मॉडेल स्कुलमधील अल्पयीन आदिवासी विद्यार्थीनीवर इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्याने लैगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बुधवार 5 ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी आरोपीस गडचिरोली पोलीसांनी अटक करुन पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी घोष यांनी निलंबित केले आहे. रत्नाकर पिट्टलवार (57) रा. पारडी पो. कवठी ता. सावली जि. चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवार 5 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पिडीता ही नेहमीप्रमाणे नाष्टा करण्याकरिता डायनिंग रूम मध्ये गेली व नाष्टा करून वसतीगृहात परतत असतांना एकटी असल्याचा फायदा घेवून आरोपीने तिच्यावर लैगीक अत्याचार केला. पिडीतेने सर्व हकिकत शाळेतील अधीक्षीका यांना सांगीतली असता तात्काळ अधीक्षीका यांनी मुख्याध्यापक व पोलीसांनी माहिती दिली. मुख्याध्यापक यांनी सदर प्रकार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. पोलीसांनी आरोपीस अटक करुन पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी या प्रकरणी आरोपीला निलंबित केले आहे. सदर घटनेमुळे मात्र पालक वर्गात रोष व्यक्त करण्यात येत आहे.