.श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
सावली तालुक्यातील उपवन परीक्षेत्र व्याहाड खुर्द नियतक्षेत्र सामदा बुज कक्ष क्रमांक 201राखीव वन येथे निलसनी पेडगाव येथील वडील वासुदेव दहेलकर सोबत मुलगी वंदना मारोती वाकूडकर वय 40 ही धान कापणी झाल्या नंतर भारे बांधण्यासाठी शिंद कापण्या साठी जंगल परिसरात गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने वंदना मारोती वाकूडकर या महिलेवर हमला केला. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तिचे प्राण थोडक्यात वाचले यात महिला किरकोळ जखमी झाली असून तिला व्याहाड बुज प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आणि तेथून रेफर करून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भर्ती करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.
वरील घटना वनविभागा कळविण्यात आली आणि सदर घटना चा पंचनामा rfo व्ही ए राजूरकर सावली , आर जी कोडापे क्षेत्र सहायक अतिरिक्त कारभार व्याहाड,वनरक्षक सोणेकर वनरक्षक सामदा, एकनाथ खुडे वनरक्षक गायडोंगरी,घनश्याम बन्सोड वनमजूर आदी उपस्थित होते
सध्या या परिसरात वाघाची मोठी धुमाकूळ असल्याने वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे



