श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
पाथरी :- कोंबड्या खाण्याच्या नादात गावात घुसलेल्या अजगर या प्रजातीच्या सापाला पकडून निसर्ग मुक्त करण्यात आले पाथरी येथील प्रमोद सोनवाणे यांची चाळ असलेल्या दवाखान्याच्या मागे मंगळवार रोजी अजगर हा साप आढळून आल्याने त्याला बघण्याकरिता लोकांची गर्दी वाढू लागली असता त्याला पकडण्याकरिता टायगर वन्यजीव संस्था सावली यांच्या चमुना साप पकडण्यात करिता प्राचारण करण्यात आले असता या संस्थेचे चिंतामण तरारे, महेश गायकवाड यांनी त्या अजगर या प्रजातीच्या सापाला पकडून त्याचे वजन व लांबी मोजण्यात आली असता अंदाजे चार वर्ष, लांबी आठ फूट, वजन आठ किलो पाचशे ग्रॅम असे सांगण्यात आले त्यानंतर त्या अजगर सापाला जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले यावेळी वन विभागाचे वनरक्षक खेमराज गोडसेलवार, राजू केवट, राकेश कोहळे व टायगर वन्यजीव संस्था सावलीचे चिंतामण तरारे, महेश गायकवाड उपस्थित होते