श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
राज्यातील गोरगरीब नागरिकांची किमान एकवेळच्या जेवणाची सोय व्हावी तीही सन्मानजनक पद्धतीने ह्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळीची योजना आणली होती ,हे शिवभोजन गोरगरीब नागरिकांना पूर्ण सन्मानाने मिळावे ह्यासाठी सरकारने शिवभोजन चालकाकडे स्वयंपाकगृहाच्या सोयीसह किमान पंचवीस लोक बसून जेवू शकतील व तिथे पिण्याच्या पाण्याचीही योग्य सोय असेल व जेवण उत्तम दर्जाचे असेल ह्याची खात्री प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी करून घ्यावी अशी अट होती व ह्या अटींचे पालन करणाऱ्या व्यक्तीलाच ह्या शिवभोजन थाळीच्या कामाचे कंत्राट दिले गेले,ह्यात गैरप्रकार होऊ नये म्हणून जेवण करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड व मोबाईल वर फोटो घेण्याचीही अट होती, परंतु राजुरा शहरात मात्र ह्यापैकी कुठल्याही अटी शर्थीचे पालन न होताही प्रशासनाने कॅटरिंग व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीला शिवभोजन थाळीचे कंत्राट दिले,
सदर कंत्रातदाराकडे ह्या शिवभोजन केंन्द्र संचालकाकडे किमान पंचवीस लोक बसून भोजन करू शकतील अश्या कुठल्याही खोलीची सोय नाही ,सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजुला सरकारी जागेवर व प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर ताटव्याचे तात्पुरते शेड उभारून तिथे ह्या शिवभोजन चे वितरण करण्यात आले जिथे रस्त्यावर उभे राहून गरीब नागरिकांना हे भोजन ग्रहण करावे लागत होते परंतु रस्त्यावर उभे राहून भोजन करणे अपमानजनक असल्याने अनेक नागरिक गरज असूनही हे भोजन घेणे टाळत होते,तर काही नागरिक हे भोजन कागदात गुंडाळून घरी घेऊन जात होते , कालांतराने ह्या ठिकाणी नगर परिषदे कडून सौन्दर्यीकरणाचे काम करण्यात आल्याने हे शेड हटवण्यात आले मग ह्या केंद्र संचालकाने बस स्थानकाच्या बाजूच्या रस्त्यावर परत ताटव्याचे तात्पुरते शेड उभारून भोजन वाटपास सुरवात केली आहे,ह्या ठिकाणीही बसण्याची कुठलीही सोय नाही प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे ,ह्या रस्त्यावर जिथे नागरिकांना धुळीमुळे श्वास घेणे कठीण होते अश्या रस्त्यावर उभे राहून जेवण करणे हे त्या गरजवंत नागरिकांना किती अपमानजनक आणि त्रासदायक ठरत असेल ह्याची कल्पना कदाचित प्रशासनाला नसावी.
शिवभोजन केंद्राच्या ठिकाणी अन्न न शिजवता ते कॅटरींग चालकाच्या मालकीच्या असलेल्या एका लग्नाच्या हॉल मधून आणले जाते,अनेकदा ह्या संचालकाकडे लग्नाच्या ऑर्डर मधील उरलेले जेवण शिवभोजन म्हणून दिले जात असल्याचीही काही नागरिकांची तक्रार आहे ,परंतु इतक्या सगळ्या अटींचे उल्लंघन करूनही मागील तीन वर्षांच्या काळात एकदाही प्रशासनाने ह्याकेंद्र संचालकविरोधात कारवाई केली नाही प्रशासनातील अधिकारी ह्या केंद्र संचालकांच्या कुठल्या दबावात आहे ह्याचीही आता नागरिक चर्चा करू लागले आहे प्राप्त माहिती नुसार राजुरा तहसील कार्यालयातील सर्व कारेक्रमात व निवडणूक काळातील भोजनाचे कंत्राट ह्याच केंद्र संचालकड़े असते,त्यामुळे तर ह्या संचालकाकडे प्रशासनातील अधिकारी कानाडोळा करत नाही ना असा संशय आता नागरिक व्यक्त करीत आहे,एका स्वयंसेवी संस्थेने आता ह्या सर्व प्रकाराची तक्रार राज्याचे अन्न पुरवठा मंत्री ह्यांच्याकडे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे केल्याची खात्री लायक।माहिती आहे ,आता ह्या तक्रारी नंतर तरी प्रशासनाचे अधिकारी कारवाई करतात की ह्यांचे साटेलोटे असेच चालू राहते ह्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे