जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर गडचिरोली
दि. २४ ऑक्टोबर २०२२
ऐन दिवाळीच्या दिवशीच नरभक्षक वाघाने शेतात कामानिमित्त गेलेल्या शेतकरी श्री. प्रभाकर तुकाराम निकुरे वय 55 वर्ष रा. कळमटोला ता. जि. गडचिरोली यांना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची दुर्देवी घटना गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथे दि. 24 ऑक्टोबर रोजी 03:00 वा. सुमारास घडली.
या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन मृतक शेतकऱ्याचा मृतदेह गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली.
गडचिरोली तालुक्यात नरभक्षी वाघाची दहशत कायम असून दिवाळीच्या दिवशी ही दुर्देवी घटना घडल्याने निकुरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.