व्यायाम करायचे असेल तर स्मशानात जा – माकोना येथील वास्तव

 

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

 

चिमूर तालुक्यातील अनेक गावात जिल्हा परिषदच्या माध्यमातून व्यायाम साहित्य आले आहेत. अनेक गावात व्यायाम साहित्य नागरिकांच्या सेवेसाठी लावण्यात आले आहेत. मात्र माकोना येथे चक्क गावातील स्मशान भूमीतच व्यायाम साहित्य लावले आहेत. त्यामुळं व्यायाम करायचा असेल तर स्मशानात या असे म्हणायला वावगे ठरणार नाही.

शासनाची मोहीम होती की “गाव तिथे क्रीडांगण” या क्रीडांगणकरिता पायका च्या माध्यमातून प्रत्येक गावात एक क्रीडाश्री नेमण्यात आले होते याकरिता जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून 10 लाख रुपये निधी प्राप्त सुध्दा झाला होता मात्र हा निधी कुठे मुरला हे कळेनासेच झाले.

 

शासनाने आता प्रत्येक गावात व्यायाम साहित्य पुरविले तालुक्यातील माकोणा गावात सुध्दा जिल्हापरिषदच्या माध्यमातून व्यायाम साहित्य लावण्यात आले. पंरतु हे व्यायाम साहित्य चक्क गावातील स्मशान भुमित लावण्यात आले. त्यामुळे लहान मुले किंवा गावातील नागरिक भिती दाखल या व्यायाम साहित्याचा वापर करत नाही आहेत. व्यायाम साहित्यही अश्या ठिकाणी लावले आहेत कि त्या ठिकाणी लहान बालकांना धोका आहे. कारण ज्या स्मशान भूमीत व्यायाम साहित्य लावले आहेत त्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा हौदोस राहून रानटी डुक्कराचा सुध्दा हाहाकार असतो. लावण्यात आलेले व्यायाम साहित्य गावापासून अर्धा किमीवर लावण्यात आले आहे. त्यामुळेच नागरिकांत तिव्र असंतोष निर्माण झाला असल्याचे मत दैनिक पुण्यनगरी जवळ भिम आर्मी संविधान रक्षक चे तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी सांगितले.

येथील लावण्यात आलेले व्यायाम साहित्य जिल्हा परिषद व ग्रामपंचायतने तात्काळ गावाजवळ व सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून लावण्यात यावे आणि योग्य ते व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे याकरीता भिम आर्मि संविधान रक्षकदल महाराष्ट्र राज्य चिमुरच्या वतिने पुढाकार घेत प्रशासकीय पातळीवर कारवाईची मागणी भिम आर्मीचे जगदीश मेश्राम यांनी केली आहे.

अन्यथा जिल्हापरिषद प्रशासन याच्यावंर कारवाई ची मागणी चंद्रपुर जिल्हाधिकारी यांना निवेदना मार्फेत करण्यात येणार असल्याचे मत जगदीश मेश्राम चिमुर तालुका अध्यक्ष यानी दैनिक पुण्यनगरी जवळ सांगितले आहे.