मानोरा-कोठारी रस्त्यावरील खड्डे बूजविण्याचे काम निकृष्ट

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

खड्डे भरायचे काम नियमबाह्य
कामावर अभियंत्यांची गैहजेरी

मानोरा-कवडजई-कोठारी रस्त्याचे खड्डे भरायचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून अंदाजपत्रकाला बॅगेत ठेऊन,खड्डे भराईचे नियमाला मूठमाती देत अभियंत्यांच्या गैरहजेरीत थातुरमातुर काम सुरू आहे.भरलेले खड्डे भविष्यात टिकाव धरणार काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मानोरा-कवडजई-कोठारी रस्त्यावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची वाट लागली आहे.रस्त्याची दुर्दशा झाली असून या मार्गावरून दुचाकी,चारचाकीने वाहतूक करतांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.रस्त्याची डागडुजी करून पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी होऊ लागली होती.अशात सार्वजनिक बांधकाम उपविभाग बल्लारपूरच्या अभियंत्यांनी रस्त्यावर खड्डे बूजविण्याचे काम ठेकेदारामार्फत नुकतेच सुरू करण्यात आले आहे.रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांना खोदून त्यातील माती बाहेर काढून त्याची सफाई करून त्यावर योग्य प्रमाणात डांबर टाकून गिट्टी पसरवून पसरविलेल्या गिट्टीवर प्रमानब्ध डांबर टाकून त्यावर चुरा गिट्टी टाकून त्यावरून रोडरोलरने दबाई करायची आहे.मात्र त्याचा वापर करताना दिसून येत नाही.पडलेल्या खड्ड्यात सफाई न करता त्यावर गिट्टी टाकण्यात येत आहे.त्यावर डांबराचा वापर नगण्य प्रमाणात करण्यात येत आहे.खड्डे बुजविण्याच्या कामावर बांधकाम विभागाचे अभियंता किंवा कोणीही प्रतिनिधी पूर्णवेळ हजर राहत नाही त्यामुळे ठेकेदारांच्या मनमर्जीने निकृष्ठ काम सुरू आहे.ज्या वेळी अभियंता काम पाहणी करण्यासाठी येतो त्यांचे समोर खड्डे खोदून प्रमाणात डांबर मारून रोडरोलरने दबाई करून बुजविले जातात.मात्र काही वेळासाठी अभियंता कामावर असतो.त्याचे फोटो घेऊन उत्कृष्ट काम सुरू असल्याचा देखावा करीत फोटो अपलोड करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगले काम होत असल्याची माहिती देतो. मात्र अभियंता कामावरून गेल्यानंतर ठेकेदार निकृष्ट कामाला सुरुवात करतो.त्यामुळे बुजलेले खड्डे भविष्यात टिकाव धरणार काय?अल्फावधीत खड्डे जैसे थे होणार आहेत.खड्डे बूजविण्यासाठी करण्यात आलेला खर्चाचा काय उपयोग.केवळ ठेकेदार व अभियंत्यांच्या हातमिळवणीमुळे शासनाचा निधी खर्च होतो त्यात अभियंता व ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे.रस्त्यावर पडलेले खड्डे नियमाप्रमाणे काम करून बुजविण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.