जिवती तहसील कार्यालयातील कारकून निलंबित

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

जीवती तहसील कार्यालयातील कारकून गणपत बालाजी सोडनर यांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. गणपत सोडनर यांनी आपल्या नातेवाईकाच्या नावाने  7/12 तयार केल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा अधिकारी यांना प्राप्त झाल्या होत्या. मोजा चिखली येथील सर्वे क्रमांक 1 पैकी 1.62 हे. आर. आकारणी 4.00 गणपत सोडनर फेरफार क्रमांक.185चि 7/12 मध्ये नोंद आहे. परंतु फेरफार पंजीत क्र.186 दर्शविण्यात आले. फेरफार क्रमांक मध्ये खोडतोड करण्यात आले. सन 1992 च्या आदेशान्वये दि.18.5.2022ला फेरफार देण्यात आला. मौजा चिखली खुर्द येथील सं. क्र.1 पैकी 2.00हे. आर. आकारणी 5. O0 मध्ये श्रीनिवास बालाजी सोडनर फे. क्र.188 अशी नोंद आहे त्या पानाला पुष्ट क्रमांक दिलेला नाही, खोडतोड, साक्षरी व हस्तक्षरात तफावत असल्याचे आढळले. सं. क्र.404-429 आर 2.00 हे. आर जमीन कोमल गणपत सोडनर यांच्या नावे असून 7/12 इतर अधिकार मध्ये 1991_92 मध्ये वाटप आधारे मिळण्याची नोंद आहे. मोजा. पालडोह,टेकामांडवा व इतर ठिकाणीही नातेवाईकाच्या नावाने 7/12वर बोगसपट्ट्याद्वारे तसेच चुकीच्या पद्धतीने फेरफार घेऊन नावे कळविण्यात आल्याने गणपत बालाजी सोडनर यांना निलंबित करून शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनि दिले आहेत. तर सोडनर यांचे मुख्यालय सिंदेवाही राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.