श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चिमूर तालुक्यातील खानगाव ते सावरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली होती. त्यामुळे या रस्त्याने ये -जा करणाऱ्या शेतकरी विद्यार्थी शेतकरी शेतमजूर व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.सदर रस्त्यावरील गिट्टी उसळलेली होती. त्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले होते .जाणारया विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व नागरिकांना रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ता असा प्रश्न पडला होता. याबाबत प्रहार सेवक विनोद उमरे यांनी या रस्त्यांचे दुरवस्था लक्षात घेत.संबधित विभागडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत अखेर अडीच किलोमीटर खानगाव ते सावरी (बिड) रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले .तर प्रहार सेवक विनोद उमरे यांनी शासन दरबारी प्रश्न मांडत होते. अखेर प्रशासनाने व याबाबत दखल घेत खानगांव ते सावरी (बिड) रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. यावेळी प्रहार सेवक विनोद उमरे व त्यांचे सहयोगी प्रहार सेवक मुरलीधर रामटेके, सचिन घानोडे, लोकेश खामनकर , नारायण मत्ते, मिलिंद खोब्रागडे, सत्यपाल गजभे, सुजित बैले, या डांबरीकरण रस्त्याचे मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते.