श्री.भुवन भोंदे,प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज
वडसा – कुरखेडा मार्गावरील नाल्यावर अतिक्रमण करून केलेले पक्के बांधकाम येत्या आठ दिवसांत हटविण्याची कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यानगर येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे. ही जागा महसूल विभागाची असल्याने नगरपंचायत अतिक्रमण काढण्यास असमर्थ आहे व ते शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन ठरेल, अशा आशयाचे उलट पत्र तहसीलदारांना पाठविलेले आहे. सदर पत्र व्यवहाराबाबत स्थानिक नागरिकांना कुठलीही माहिती उपलब्ध न झाल्याने बुधवारला आक्रमक झालेले विद्यानगर येथील नागरिक थेट नगरपंचायतवर धडकले. नगराध्यक्ष अनिता बोरकर व गटनेता आशिष काळे यांच्यासह अध्यक्षांच्या कक्षात सदर अवैध बांधकाम व पूर परिस्थिती संदर्भात नगरपंचायत ची भूमिका जाणून घेण्यासाठी चर्चा झाली. या चर्चेमध्ये नगरपंचायतने आपण अतिक्रमण काढण्यासाठी तयार आहोत परंतु नियमानुसार सदर जागा ही महसूल विभागाची असल्याने माननीय तहसीलदार यांनी तसे पत्र नगरपंचायतला द्यावे, असे बोलून दाखवले. सदर जागा ही महसूल विभागाची असल्याने शासनाच्या जीआर प्रमाणे कारवाई अपेक्षित आहे.