नहरात डूबुन ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

दि.२०/११/२०२२

ब्रम्हपुरी 

ब्रम्हपुरी  तालुका मुख्यालयापासून अवघ्या ७ किमी अंतरावर असलेल्या रानबोथली येथील अमृता संदीप मरसकोल्हे (वय ११वर्ष) ही गावालगत असलेल्या गोसीखुर्द कालव्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना 20 नोव्हेंबरला सकाळी 11.00 वाजताच्या दरम्यान घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक अमृता ही आपल्या आजी सोबत शेतावर गेली होती. तेव्हा ती शौचासाठी लगतच्या शेतात गेली. त्यानंतर शौच धुण्यासाठी जवळच असलेल्या गोसीखुर्द कालव्याजवळ गेली. कालव्यात पायऱ्यांवरून उतरत असताना तिचा तोल गेल्यामुळे ती पाण्यात पडुन बुडली.

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी कालव्याकडे धाव घेऊन नहरातील पाण्यात शोध घेतला असता अमृता मृत अवस्थेत आढळून आली.
त्यानंतर सदरची ब्रम्हपुरी पोलिसांना कळवताच ब्रम्हपुरी पो.स्टे.चे पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे,पोलीस हवालदार राजेश्वर धंदरे, पो.ह. प्रकाश दुपारे यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.