श्री.भुवन भोंदे, प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२३/११/२०२२ वडसा
वडसा तालुक्यातील कुरुड गावाजवड स्कुल बसला कारची समोरासमोर धडक होऊन तिन विद्यार्थी गंभीर तर नऊ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज दि. २३ नोव्हेंबर ला ३.३० वाजता वडसा, कुरुळ रोड जवळ घडली. school bus & car accident at kurud ( wadsa)
प्राप्त माहिती नुसार वडसा कडून विद्यार्थी घेऊन येणारी स्किड्स होम येथील स्कूल बस कुरुड येथील मुलांना घरी सोडण्यासाठी जात असताना आरमोरी कडून येणाऱ्या कारने धडक दिली. त्या दुर्घटनेमध्ये तिन विद्यार्थी गंभीर तर कुरुड येथील नऊ विद्यार्थी जख्मी झाले आहेत. त्यामधील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून स्कूलबस च्या ड्रायव्हरचा एक पाय आणि एक हाथ निकामी झाला आहे अशी माहिती मिळाली आहे , घटनेची माहिती मिळतात वडसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि चमू घटनास्थळी येऊन पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.