श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२२/११/२०२२
तळोधी बा पोलीस स्टेशन ची विशेष कामगिरी
तळोधी बा. अप्पर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोसीखुर्द कालवा व सिमेंट क्रांक्रिट चे रस्ते बांधकाम करिता रेतीची आवश्यकता असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी होत आहे. मात्र रेती तस्करी साठी याठिकाणी रात्री च्या वेळेस १० ते १२ ट्रक्टर ने अवैध तस्करी होत आहे. रेती तस्करी धारकांकडून शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडवून तस्करी होत असताना तळोधी बा. पोलीस स्टेशन चे ठाणेदार दिनकर शेंडे साहेब यांनी काल रात्री च्या गस्ती सुरू असताना सावरगाव तळोधी मार्गाने रेती ची ट्रक्टर ने अवैध तस्करी होत असलेल्या ट्रक्टर ला तळोधी बा. पोलीस ठाण्यात जमा केले. ट्रक्टर व ट्रॉली विना नंबर प्लेट असून नांदेड येथील रेती एका रेती तस्करी करणाऱ्या व्यक्ती चा असल्याचे सांगितले जाते. तळोधी बा. पोलीस यांनी पंचनामा करून कारवाई करण्यात यावी यासाठी नागभीड तहसीलदार यांना रिपोर्ट सादर करण्यात आली आहे. त्यामुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहणावर कारवाई करण्याची मागणी नागरिक यांनी केले आहे.