श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
नागभीड, दि. १२/१२/२०२२
गेल्या आठवड्यात म्हसली परीसरात वनविभागाने तिन बळी घेतलेल्या त्या नरभक्षक वाघाला पकडुन त्यांचा बंदोबस्त केला.तरी सुद्धा पुन्हा त्याच परीसरात वाघाचे दर्शन होत असल्याने शेत शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांन मध्ये दहशत निर्माण झाली आहे. ढोरपा,पाहर्णी,मौशी,इरव्हा(टेकरी),म्हसली परीसरात गेल्या अडीच महिण्या पासुन वाघाने चांगलाच धुमाकुळ घालत तब्बल तिन मानवाचा बळी घेत एका महीलेला गंभीर जख्मी केल्याची घटना घडली आहे.त्या नरभक्षक पि.टु.वाघाला म्हसली येथिल ५२ क्रमांकाच्या वनात मागीलआठवड्याच्या शनिवारला दुपारी अडीच वाजता जेरबंद करण्यात वनविभागाला यश प्राप्त झाले आहे. tiger seen, farmrs are frightened
गेल्या अडीच महीण्या पासुन वाघाने या परीसरात शेतशिवारात येऊन चांगलाच धुमाकुळ घातला होता.त्यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांन मध्ये प्रचंड भिती निर्माण झाली. त्यामुळे या परीसरातील पाच ग्रामपंचायती एकञ ऐऊन वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी उपवनसंक्षक कार्यालय ब्रम्हपुरी येथे गेल्या पंधरा दिवसा आधी निवेदन दिले होते. सदर वाघाचा बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला गेला.या परीसरात गावकरी यांच्या माहीती नुसार तब्बल चार ते पाच वाघ आहेत. एकाचा बंदोबस्त केला पण त्या आणखी वाघाचे काय? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.पुन्हा वाघाचे दर्शन सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.मानव वन्यजिव संघर्ष माञ कायम आहे. एका वाघाला जेरबंद केले तरी अजुनही वाघा विषयी दहशत कायम आहे.तरी त्या उर्वरीत वाघाचा त्वरीत बंदोबस्त करावा.अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा परीसरातील गाववाशियांनी दिला आहे.
मागील आठवड्यात एका नरभक्षक वाघाला म्हसली परीसरात पकडुन बंदोबस्त केला.पण पुन्हा मौशी परीसरात वाघाचे मानवाला दर्शन होत आहे.त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांन मध्ये पुन्हा दहशत निर्माण झाली आहे.या परीसरात चार ते पाच वाघ असल्याची माहीती आहे.तरी वनविभागाने त्या वाघाचे बंदोबस्त करावे. नाही तर आम्हाला आंदोलन करावे लागेल.-श्री.पुरुषोत्तम बघमारे उपसरपंच मौशी. ग्रा.पं.