चामोर्शी नगरपंचायत प्रशासनातर्फे आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिना निमित्त स्थानिक बाजार चौक येथे असलेल्या हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा स्मारकाला मार्ल्यापर्ण करून वीर पुरुष यांना अभिवादन करण्यात आले . तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य सांस्कृतिक भवन येथे सर्व नगरपंचायत कर्मचारी ,पदाधिकारी ,नगरसेवक यांच्या उपस्थितीत प्रास्ताविका वाचन करण्यात आले .
यावेळी नगरपंचायत चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवार ,उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे ,सभापती सुमेध तुरे ,नगरसेवक निशांत नैताम ,आशिष पिपरे व नगरपंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते .