शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी लावलेल्या पेंडालसमोर स्वखर्चाने पाणी टाकून धुळीपासून बचाव करण्याची नामुष्की.

korchi dusty road
korchi dusty road

श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा, न्यूज जागर

 कोरची,दि.३१/०१/२०२३

शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. निवडणूक केंद्र तहसील कार्यालय होते. कोरची पासून एक किमी अंतरावर, भिमपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर तहसील कार्यालय आहे.

शिक्षक मतदार संघाची निवडणूकीमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधून आलेल्या मतदार शिक्षकांना विसावा घेण्यासाठी भाजपा, कांग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि अपक्ष उमेदवारांनी रस्त्याच्या कडेला पेंडाल लावून चाय पाण्याची व्यवस्था केली होती. परंतु या मार्गावर धुळीचे साम्राज्य आहे. कोरची येथील राजकीय पुढाऱ्यांचा एका दिवसातच या रस्त्यावरील धुळीने जीव गुदमरला आणि पेंडाल समोर स्वखर्चाने पाणी टाकून धुळीपासून बचाव करण्याची नामुष्की ओढवली.   korchi’s poltical leaders harrash because of dust, poured water with their own money 

कोरची- भिमपूर या ४ किमी रस्त्याचे काम मागील दिड वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याने छत्तीसगढ मधुन महाराष्ट्र, आंध्रप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात ट्रक जातात. त्यामुळे गिट्टी पुर्णतः उखडली असल्याने या मार्गे जेव्हा ट्रक जातात, तेव्हा धुळीचे ढग सभोवताली पसरतात. Four km road is not completed from 1.5 years at korchi

या रस्त्याच्या कडेला पहील्या वर्गापासून बारावी पर्यंतची शासकीय आश्रम शाळा आहे. शासकीय मुलींचे वसतिगृह, शासकीय मुलांचे वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, लोकांची वस्ती, आणि सर्वात महत्त्वाचे कार्यालय ते म्हणजे ग्रामीण रुग्णालय.

धुळीचे कण नाक, तोंडावाटे डायरेक्ट मनुष्याच्या फुफ्फुसात, घशात जातात. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या अनेक लोकांना आजार झाला आहे. विशेषतः लहान मुले, म्हातारे आणि गरोदर माता.

शिक्षक आमदार निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच प्रमुख पक्षांनी जसे भाजपा, कॉग्रेस,राका,शिवसेना,आम आदमी पार्टीच्या लोकांनी या रस्त्याची स्थिती, त्याचे दुष्परिणाम अनुभवले.