श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
मूल,दि.०८/०२/२०२३
गावाच्या सौंदर्यीकरणासाठी ग्राम पंचायतने सुमारे 18 लाख रूपये खर्च करून सौंदर्यीकरणाच्या कामाची ऑनलाईन निवीदा काढण्यात आली होती, सदर कामाचे कार्यारंभ आदेश आणि करारनामा ग्राम पंचायतने कंत्राटदाराला देन्यासाठी तयार केले आहे, याआदेशात अनेक त्रुटया आढळून आले आहेत यावरून ग्राम पंचायतचे सरपंच, सचिव यांचे अज्ञान की जाणीवपूर्वक तयार करण्यात आले यावरून तर्कवितर्क लावले जात आहे मात्र सदर प्रकरणावरून फिस्कुटी ग्राम पंचायतचा भोगळकारभार चव्हाटयावर आल्याचे दिसून आले आहे.
strange work of fiskuti gram panchayat
मूल तालुक्यातील मौजा फिस्कुटी ग्राम पंचायतला सन 2021-22 यावित्तीय वर्षात जिल्हा निधी मधून वेगवेगळ्या कामांसाठी करोडो रुपये मंजुर करण्यात आले होते, सदर निधीमधुन फिस्कुटी येथील मुख्य चौकात सौंदर्यीकरणाच्या कामासाठी सुमारे 18 लाख 31 हजार 614 रूपये अंदाजकीय किमतीची निवीदा ऑनलाईन टाकण्यात आली होती, त्यानुसार शेगांव येथील शंभु फर्निचर आर्ट यांना अंदाजकीय किंमतीनुसार काम मिळाले. दरम्यान ग्राम पंचायतने शंभु फर्निचर आर्ट सोबत करारनामा करून घेताना आणि कार्यरभ आदेश देताना काम सुरू करण्याचा दिनांक टाकलेला नाही, आणि कार्यारंभ आदेशात केवळ 2022 पासुन धरण्यात येईल असा उल्लेख आहे तर करारनाम्यात 2021 पासुन धरण्यात येईल असा उल्लेख आहे मात्र कुठेही तारीख टाकण्यात आलेली नाही, सदर काम जवळपास 50 टक्के पुर्ण झालेला आहे मात्र करानाम्यावर कंत्राटदाराचीं स्वाक्षरी नाही यावरून फिस्कुटी ग्राम पंचायतने नियमाचे तिनतेरा वाजवित असल्याचे मिळालेल्या कार्यरंभ आदेश आणि करारनाम्यावरून दिसुन येत आहे. News Jagar
चंद्रपूर जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मोठया प्रमाणावर फिस्कुटी ग्राम पंचायतला ‘‘विकास’’कामाच्या नावावर करोडा रूपयाचा निधी दिलेला आहे, मारोडा-राजोली जिल्हा परिषद क्षेत्रातुन निर्वाचीत झालेल्या संध्याताईचे प्रेम बेंबाळ जुनासुर्ला जिल्हा परिषद क्षेत्र असलेल्या आणि चिरजीव सरपंच असलेल्या फिस्कुटी ग्राम पंचायतला मोठया प्रमाणावर निधी दिल्याने मारोडा-राजोली जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक राजकीय पुढारी दुखावल्याची चर्चा सध्या तालुक्यात ऐकायला मिळत आहे.
कामांच्या ऑनलाईन निवीदा टाकताना कंत्राटदाराकडुन किमान 1 टक्के अनामत रक्कम घेणे आवश्यक आहे मात्र फिस्कुटी ग्राम पंचायतच्या सरपंच, सचिवांनी स्वाक्षरी करून दिलेल्या कार्यरभ आदेशात शंभू फायबर आर्ट यांना यापुर्वी अनामत म्हणुन 5200 भरलेली रक्कम सुरक्षा रक्कम गृहीत धरून उर्वरीत सुरक्षा रक्कम देयकातुन वसुल करण्यात येईल असे नमुद केले आहे, 18 लाख 31 हजार रूपयाच्या कामासाठी केवळ 5200 रूपये कोणत्या नियमानुसार घेण्यात आले ? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सदर काम करणे अपेक्षीत असतानाही ग्राम पंचायतने केलेल्या करानाम्यावर उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सिंदेवाही यांच्या मार्गदर्शनानाखाली करण्यात यावे अन्यथा आपला करारनामा रद्द करण्यात येईल असेही नमुद केले आहे अशा अनेक त्रुटया फिस्कुटी ग्राम पंचायतने केलेल्या करारनामा आणि कार्यारंभ आदेशात असल्याने फिस्कुटी ग्राम पंचायतचा भोंगळ कारभार चव्हाटयावर येतांना दिसुन येत आहे.
कंत्राटदाराची स्वाक्षरी महत्वाची : जिवन प्रधान
ग्राम पंचायतने केलेल्या कोणत्याही कामाच्या करारनाम्यावर कंत्राटदाराची स्वाक्षरी असणे महत्वाचे आहे, अन्यथा त्या करारनाम्याला काहीच महत्व नसते अशी प्रतिक्रया मूल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचा) जिवन प्रधान यांनी दिली.
याबाबत फिस्कुटी ग्राम पंचायतचे ग्रामसेवक सचिन दांडेकर यांची प्रतिक्रीया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.