चामोर्शीत महिला मेळावा

चामोर्शी –

नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत नगरपंचायत सांस्कृतिक भवन येथे काल दिनांक १० ऑगस्ट रोजी महिला मेळावा घेण्यात आला.

या महिला मेळाव्याचे उद्घाटन उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे यांनी केले .तर अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष जयश्री वायलालवार ह्या होत्या. महिला मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सीमा खोबे , प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका स्नेहा सातपुते ,गीता सोरते ,रोशनी वरघंटे ,सोनाली पिपरे हे उपस्थित होते .

महिला मेळाव्याला सीमा खोबे यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी आत्मनिर्भर होऊन पुरुषाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी दाखवावी लहान मोठ्या उद्योग व्यवसायात महिलांनी हातभार लावावा महिलांच्या सक्षमीकरणासाठी मेळाव्याचे घ्यावे आपला संसार करताना संसारात काटकसर करून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे बचत गटाच्या माध्यमातून लहान मोठे लघुउद्योग करून आत्मनिर्भर व्हावे असे मत व्यक्त केले .

अमृत महोत्सवानिमित्त काल दिनांक १० ऑगस्ट रोजी नगरपंचायतप्रशासना तर्फे अंगणवाडी , बालवाडी मध्ये जाणाऱ्या व अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा बाल गोपाल महोत्सव घेण्यात आला. त्यानंतर चामोर्शी शहरातून शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थ्याची तिरंगा मिरवणूक काढण्यात आली व शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली .महिला मेळाव्याला नगराध्यक्ष जयश्री वायलवार व उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे संचालन गयाली मॅडम ,आभार कार्यालयीन अधिक्षक पेंदाम तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका रोशनी वरघंटे यांनी पार पाडले . या महिला मेळाव्याला बचत गटांच्या महिला व नगरपंचायत कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.