दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी संस्कृती सांस्कृतिक भवन आरमोरी रोड गडचिरोली येथे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन व विविध संघटनांच्या संयुक्त आयोजन समितीमार्फत जागतिक मूळनिवासी दिवस साजरा करण्यात आला. त्यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्याबद्दल आदिवासी समाजातील कुमारी सुरभी राजन येरमे व कुमारी पायल राजन येरमे यांचा गुणवंत विद्यार्थीनींचा सन्मान चिन्ह देऊन जि. प. गडचिरोलीचे मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आर्शिवाद ह्याचे हस्ते सत्कार करण्यात आला. सुरभी हिने यशवंतराव चव्हाण काँलेज आँफ इंजिनियरींग नागपूर येथून B. E. (Mech.)ही पदवी प्राप्त करुन GRE परीक्षे अंतर्गत University of Michigan Dearborn USA येथे Industrial System & Engineering (MIS-ISE) या उच्च शिक्षणासाठी निवड झाली असून. सदर उच्च शिक्षणासाठी अमेरिका येथे रवाना झाली आहे. तसेच पायल हिने National Testing Agency अंतर्गत घेण्यात येत असलेल्या Joint Entrance Examination (Main) JEE (Main) परीक्षेत उत्तीर्ण होऊन All India ST Category मध्ये 427 रँक प्राप्त केलेली आहे व पुढील शिक्षण Indian Institute of Technology Kanpur UP येथे Material Science & Engineering मध्ये निवड झाली असून दोघीच्या पण उज्वल भविष्याकरीता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डाँ. नामदेव उसेंडी, उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतिरकर, माधव गावळ, भरत येरमे, अमरसिंह गेडाम व शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.