गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि. २२/०२/२०२३
भरपूर व्याजा मिळेल असे सांगून सामान्य नागरिकांकडून पैशे घेऊन गडचिरोली येथील विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा अभिकर्ता मंगेश नरड हा जवळपास ४५ लाखांहून अधिक रक्कम घेऊन पसार झाल्याचे निष्पन्न झाले असून ठेवीदारांच्या तक्रारीवरुन गडचिरोली पोलिसांनी मंगेश नरड याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
विजया गद्देवार अध्यक्ष असलेल्या विजया महिला नागरी सहकारी पतसंस्था मध्ये अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून दैनंदिन ठेवी पतसंस्थेचा अभिकर्ता मंगेश नरड mangesh narad यांचेकडे जमा करण्यात येत होते . एका महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला मिळालेले ५ लाख रुपये नरडकडे जमा केले, पुढे पैशाची गरज भासल्याने तिने अभिकर्ता मंगेश नरड याच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद न मिळाल्यामुळे पीडित महिलेने पतसंस्थेत जाऊन चौकशी केली असता तिला “आमच्या पतसंस्थेत तुमचा एकही रुपया नाही” असे सांगण्यात आले. ijaya mahila nagari sahakari patsanstha’s bank agent make a fraud of naearbaout 45 lakh
यामुळे संशय बळावल्याने अन्य ठेवीदारांनीही चौकशी केली असता त्यांनाही हेच उत्तर मिळाले. ही सात-आठ जणांची ही रक्कम ४५ लाखांहून अधिक आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी यांच्यासह बबिता गुलात्रस, पूजा परिहार, लीला परिहार, लखन परिहार व अन्य ठेवीदारांनी याप्रकरणी तक्रार केल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी आरोपी मंगेश नरड याच्यावर भादंवि कलम ४०६,४०९,४२०,४६७,४६८ व ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मंगेश नरड सध्या फरार आहे. newsjagar