गडचिरोली शहर प्रतिनिधी,न्यूज जागर
गडचिरोली,दि.२२/०२/२०२३
गडचिरोली शहरातील आयटीआय ते गोकुळनगर बायपास मार्गावर सर्वे क्रमांक २१ मधील जमीन वनविभागाच्या मालकीची आहे. त्यातील १.२९ हेक्टर वनजमिनीवर भूमाफियांनी अतिक्रमण करुन भूखंडांची मोठ्या रकमेला विक्री केली. या प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम arvind pendam, gadchiroli forest range officer यांनी आरोपींवर गुन्हे दाखल करून थातुरमातूर कारवाई केली. परंतु पुढील कारवाई करताना त्यांनी ८ ते १० महिने चालढकल केली. Forest range officer mr arvind pendam is suspended due to
वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर Conservator of Forests Dr .kishor Mankar यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी करण्याचे आदेश दिले. परंतु पेंदाम यांनी चौकशी करताना प्रचंड दिरंगाई केली. त्यांच्या चौकशी अहवालावर संशय व्यक्त करुन प्रकरणाचा योग्य तपास करण्यात आला नाही, असा ठपका ठेवत वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी पेंदाम यांना निलंबित केले.
सदर प्रकरणात आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून त्यांच्या नावाबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. तेव्हासुद्धा वनविभागाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त करण्यात आलेला होता. शेवटी न्यूज जागर ने संशय व्यक्त केला होता कि या सर्व प्रकरणात वनविभागाचे कुणी अधिकारी तर सामील नाहीत !? आणि हा संशय खरा ठरला . वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी पेंदाम यांना निलंबित करून या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही हे स्पष्ट आपल्या कृतीतून दाखवून दिले. newsjagar
१५ जानेवारीला २०२२ ला वरील संदर्भातली बातमी न्यूज जागर पोर्टल वर आली असून त्याची लिंक पुढील आहे ,सविस्तर बातमी साठी कृपया https://www.newsjagar.com/2022/12/15/post/4312/ ला क्लिक करा