गडचिरोली पोलीस दलातर्फे नक्षलवाद्यांनी जंगलात पुरुन ठेवलेल्या २ रायफली जप्त

naxali's-two-rifals-siezed-by-gadchiroli-police

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली,दि. २१/०२/२०२३

नक्षलवाद्यांच्या घातपाती कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. टीसीओसी कालावधीत नक्षलवाद्यांकडून देशविघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असून, आज गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांनी जंगल पुरुन ठेवलेल्या 2 रायफली जप्त केल्या.

दिनांक २१/०२/२०२३ रोजीचे सकाळी १०:०० वा. चे सुमारास उपविभाग पेंढरी अंतर्गत पोस्टे जारावंडी हददीतील जंगल परिसरात मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे गडचिरोली पोलीस दल, सिआरपीएफ व एसआरपीएफ चे अधिकारी व जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवेलेल्या 02 रायफली हस्तगत केल्या. हस्तगत करण्यात आलेल्या रायफलीत 01 सिंगल बॅरल 12 बोअर रायफल व 01 एसएसआर  रायफलचा समावेश आहे. naxalis two rifal seized by gadchiroli  police in forest  area of jarawandi

सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुजीतकुमार चव्हान, प्रभारी अधिकारी पोस्टे जारावंडी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोनि. धर्मेंद्र कुमार व राज्य राखीव पोलीस दलाचे पोउपनि श्री. कांदळकर व जवान यांनी यशस्वीरित्या पार पाडले. newsjagar