मोहुर्ली रेती घाटावरून अवैध उपसा सुरु, प्रशासनाचे दुर्लक्ष्

न्यूज जागर वृत्तसेवा

चामोर्शी तालुक्यातील मोहुर्ली या रेती घाटावरुण अवैधपद्धतीने रेती चे उपसा होत असतांना मात्र प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे, जेसीबी च्या साहाय्याने रेतीचा साठा करून जादा भावात विल्हेवाट लावण्यात येत आहे अशी गावकऱ्यात चर्चा आहे.newsjagar

बिना रायल्टी ने सुरु असलेल्या या अवैध धंद्यावर मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे , दिवसाढवळ्या भरधाव वेगाने रेतीची वाहतूक सुरु असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या का बर लक्षात येत नाही ? शासनाचा महसूल बुडत आहे पण याची फिकीर शासनाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही , सदर अवैध बिना रॉयल्टी रेती वाहतुकीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ती त्वरित बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.