न्यूज जागर वृत्तसेवा
चामोर्शी,दि.११/०३/२०२३
मागील काही दिवसांपासून शहरासह परिसरात मुरूम तस्करा मार्फत अवैधरीत्या उत्खनन करून सर्रास मुरमाची वाहतूक केली जात आहे, संबंधित विभागातद्वारे यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. permision of Muddy Soil 100 brass but actual exavation more than
शहरात व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणची १०० ब्रास ची रॉयल्टी काढून १०० ब्रासच्या रॉयल्टीच्या नावाखाली जवळपास 500 किंवा त्यापेक्षा अधिक ब्रास मुरमाची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे जनतेमध्ये बोलल्या जात आहे. परंतु महसूल प्रशासनाकडून कोणत्याही वाहनांची किंवा रॉयल्टीची तपासणी केल्या जात नाही अशी चर्चा आहे , त्यामुळे मुरूम उत्खनन करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फावत आहे. परवाना एका जागेचा तर उत्खनन दुसऱ्या जागेतून केल्या जात आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे परंतु प्रशासन त्या जागेची कुठल्याही प्रकारची पाहणी करत नसल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे व सुट्टीच्या दिवशी तसेच सूर्यास्त अगोदर व सूर्यास्तानंतरही सुद्धा मुरूम उत्खनन केल्या जात आहे व वाहतूक करण्यात येत आहे. तरीही प्रशासनाची कारवाई शून्य असल्यामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडाला आहे यास जबाबदार कोण ? असा प्रश्न सुद्धा नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने परवाना मिळवलेल्या जागेची पाहणी करणे, ट्रॅक्टरची तपासणी करणे, रॉयल्टी चेक करणे हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मुरूम उत्खनन करणारे १०० ब्रासची रॉयल्टी काढून अधिकचा मुरूम नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे विशेष.News Jagar
न्यूज जागर चे मुख्यसंपादक श्री प्रदीप वाळके यांनी चामोर्शी चे तहसीलदार श्री संजय नागटिळक यांचेशी फोन वर विचारणा केली असता ,त्यांनी अल्पकालीन परवानान्यासाठी लोक अर्ज करतात ते तपासण्याची साठी पथक निर्माण केले,मंडळ अधिकारी आणि तलाठी हे तपासणी करतात, तसेच आजच १ बिना रॉयल्टीचे ट्रॅक्टर पकडल्याचे हि त्यांनी सांगितले आहे.