जिल्हास्तरीय आंतरराष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम संपन्न

नागभीड 

श्री अरुण बारसागडे तालुका प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व “आंतरराष्ट्रीय युवा दिन” निमित्याने *पिढीजात एकात्मता: सर्व वयोगटांसाठी जग तयार करणे हे घोषवाक्य घेऊन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय,चंद्रपूर , एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र,ग्रामीण रुग्णालय नागभीड व संकल्प बहुउध्येशिय ग्राम विकास संस्था द्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प,चंद्रपूर व राष्ट्पिता महात्मा गांधी महाविद्यालय नागभीड यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्पिता महात्मा गांधी महाविद्यालय नागभीड येथे मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य मा.डॉ जी डी देशमुख सर,प्रा फुडें मॅडम,प्रा राहुल पताले,प्रा कुंभारे सर,समुपदेशिका सीमा मेश्राम,LWS डी सी खोब्रागडे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ शीतल आयलनवार,यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात करतांना सर्वप्रथम उपस्थित विद्यार्थ्यांना युवा दिनानिमित्त शपथ वाचन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी उपस्थित युवकांना एचआयव्ही/एड्स, गुप्तरोग, मोबाईल चे दुष्परिणाम, एचआयव्ही रुग्णाप्रती असलेले भेदभाव व कलंक दूर करणे, व्यसनाधीनता, लैंगिक शिक्षणाचा अभाव यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्या इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मा प्रा सारंग भोयर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.एस.एस. प्रमुख प्राध्यापक मा.प्रा प्रचल ढोक सर यांनी परिश्रम घेतले.