जिल्हयात 37(1) (3) कलम लागू

श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर  

गडचिरोली,दि.२१/०३/२०२३

पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 2 मार्च 2023 पासुन इयत्ता 10 वी ची परीक्षा सुरु आहे. दिनांक 30 मार्च 2023 रोजी श्रीराम नवमी व दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येत आहे. तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे,आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 22.03.2023 चे 00.01 वा ते दिनांक 05.04.2023 चे 24.00 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम ,1951 चे कलम 37(1) (3) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आली आहे. असे अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.newsjagar