प्रेसनोट
♦ आदर्श मीडिया एसोसीएशन च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रियाताई झांबरे व चंद्रपुर जिल्हा अध्यक्षा संगिता ताई वनकर यांच्या प्रयत्नाला यश
♦ २० आँगस्ट २०२२ ला चिमुर चे वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम नी केलेल्या खोट्या गुन्हात, उपवनसंरक्षक अधिकारी श्री. मल्होत्रा यांनी घेतली न्यायाची भूमिका
♦ दिनांक १० एप्रिल २०२३ ला उपवनसंरक्षक मल्होत्रा यांनी निर्दोष ड्राइवर राहुल खोब्रागडे यांची गाडी सोडण्याचे व केस खारिज करण्याचे आदेश पारित केले
बल्लारपुर चा रहवासी राहुल सुभाष खोब्रागडे व्यवसायाने ड्राइव्हर यांनी २० आँगस्ट २०२२ ला बल्लारपुर येथील अनिकेत श्रीवास याची गुजगांव ची बुकिंग घेऊन गेला. बल्लारपुर वरुन अंदाजे ५ युवक फिरण्याकरीता म्हणुन निघाले. पाच युवकांपैकी खडसंगी चे वनपरिक्षेत्र अधिकारी धानकुटे यांचा चुलत भाऊ एक दिवस अगोदर दुबई वरुन आला होता आणी फिरायला जायचे आहे म्हणुन तो सुद्धा गाडीत बसला, बल्लारपुर वरुन ड्राइवर राहुल ला पकडुन सहाजण होते. त्यापैकी काही जण गुजगांव च्या अशोका बीयर बार जवळ थांबले. परंतु चिमुर चे वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम हे स्वतःहा दारुच्या नशेत लुफ्त असल्यामुळे, नैताम यांनी दिनांक २० आँगस्ट २०२२ रोजी निर्दोष युवकांना पकडुन खोटी केस केली. गाडीत कोणतेही वन्यजीव प्राण्याचे अवयव सापडले नव्हते. तरी सुद्धा नैताम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन गाडीत बसलेले पाच मुलं व ड्रायव्हर राहुल खोब्रागडे वर खोटा गुन्हा दाखल केला. दारुच्या नशेत लुफ्त असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम व त्याचे सहकार्यांनि मुलांना खुप मारले. आणी अंबादास मानकर यांची गाडी सुद्धा गुन्ह्यात घेतली. vehicle relised from forest department which detain in false case
दिवसेंदिवस ब्रम्हपुरी वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची दादागीरी वाढतच जात आहे. शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन सुद्धा यांना चैन पडत नाही. म्हणुन गरिब राहुल खोब्रागडे यांना चिमुर चे वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम यांनी १,०००००/- एक लाख रुपयाची मागणी केली. राहुल खोब्रागडे निर्दोष असतांना सुद्धा राहुलच्या आईने दुसऱ्याकडुन व्याजेनी पैसे घेऊन ३०,०००/- देण्यास तयार झाली परंतु आँनड्युटी दारुच्या नशेत लुफ्त असलेला नैताम यांनी नकार देऊन पूर्ण पैशाची मागणी केली . अशा अधिकाऱ्यांना वनविभागानी तात्काळ निलंबनाची कारवाई करायला पाहिजे जेणेकरुन संशयाच्या आधारावर गोरगरीबांवर अन्याय होणार नाही. गुन्हा नसतानां राहुल खोब्रागडे ला दोन दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागले याला जबाबदार संपुर्ण वनविभाग आहे. मुख्य वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपुर, तसेच उपवनसंरक्षक ब्रम्हपुरी यांचेकडे तक्रार करुन सुद्धा नैताम वर कारवाई केलेली नाही.Newsjagar
परंतु जेव्हा आदर्श मीडिया एसोसीएशन च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रियाताई झांबरे व चंद्रपुर जिल्हा अध्यक्षा संगिता ताई वनकर आणि ड्राइवर राहुल खोब्रागडे यांनी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम यांनी केलेली कार्यवाही ही खोटी असल्याचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणुन दिले. व सत्यता समोर आणुन दिली त्यावेळेस उपवनसंरक्षक श्री. मल्होत्रा यांनी निर्दोष ड्राइवर राहुल खोब्रागडे यांची गाडी सोडण्याचे व केस खारिज करण्याचे आदेश पारित करुन खरोखरच न्यायाची भूमिका घेतलेली आहे.