चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्युज जागर
चामोर्शी,दि.११/०५/२०२३
चामोर्शी येथील जा. कृ. बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात ‘शासकीय योजनांची जत्रा’ अंतर्गत बाहेरगावाहून शिक्षणासाठी शाळेत ये – जा करणाऱ्या गाव ते चामोर्शी बसस्टँड अंतर 2 ते 5 कि मी आहे अश्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत 35 मोफत सायकलचे वितरण नुकतेच करण्यात आले .
याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्र . प्राचार्य – ईतेंद्र चांदेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून पालक – शिक्षक संघाचे सहसचिव – श्री पुरुषोत्तम घ्यार , प्राध्यापक – महेंद्र बुर्लावार , सौ. इंदिरा नागदेवाते, खुशाल कापगते ,स.शि. अशोक गजभिये , घनश्याम मनबत्तूलवार , आदी मान्यवर उपस्थित होते. NEWSJAGAR
मान्यवरांच्या हस्ते 35 विद्यार्थिनीं लाभार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांनी विद्यार्थिनींना सायकलने शाळेत नियमित ये – जा करून आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले .
लाभार्थ्यात वर्ग 8 ते 12 च्या विद्यार्थिनी कु.श्रेया सातपुते, सौंदर्या जुवारे, तन्वी चलाख , कोयल कुनघाडकर, प्रणया नैताम, आकांक्षा सातपुते ,मनस्वी वाद्देलवार, अक्षरा थेरकर, देवयानी धोंगडे, वैष्णवी सहारे ,प्रांजल गायकवाड, मयुरी सातपुते, प्राची बुरांडे, प्रियंका गायकवाड, सानिया धोडरे ,सानिका सातपुते, श्रुती बुरांडे ,पायल बुरांडे,सानिया रामटेके , वैष्णवी दहेलकर, रंजू दुधबळे, नंदिनी गौरकर, दीक्षा श्रीकुंटवार,साची चूनारकर, श्वेता झाडे, प्रतीक्षा कोठारे ,नवमी गौरकार ,वासंती बुरांडे ,विद्या गव्हारे ,आचल सातपुते, समीक्षा निमडर, अश्विनी वासेकर, आचल नैताम, प्रचिता पिपरे, आचल कुणघाडकर यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे संचालन- प्राध्या. नोमेश उरकुडे, तर आभार प्रदर्शन स. शि .संतोष चावरे यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक ,विद्यार्थीनी उपस्थित होते.