न्युज जागर वार्ता , गडचिरोली
गडचिरोली ,दि.१२/०५/२०२३
तीन महिन्यांपूर्वी मुलीने आत्महत्या केल्याने मानसिक तणावात आलेल्या आईने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गडचिरोली शहरातील इंदिरानगरात ११ मे रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास घडली.
सुषमा गाथाराम निकुरे (४०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे असून सुषमा यांची दहाव्या वर्गात शिकत असलेली पुनम हिने तीन महिन्यापूर्वी घरीच गळफास घेतला होता. त्यामुळे सुषमा ची मानसिक स्थिती बिघडली होती. अधून-मधून बडबड करत होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. घटनेच्या दिवशी पती गाथाराम निकुरे हे कामासाठी तळोधी येथे गेले होते. दुसऱ्या वर्गात शिकत असलेला मुलगा खेळण्यासाठी शेजारच्या घरी गेला होता. नेमकी हीच वेळ बघून सुषमाने घराच्या आळ्याला ओढणीने बांधून गळफास घेतला.mental stressed mother hang herself after daughters suicide
मुलगा घरी आल्यांनतर लक्षात येताच शेजारच्यांना बोलावून तिला खाली उतरविले. मात्र, तोपर्यंत जीव गेला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलीनंतर आईनेसुद्धा आत्महत्या केल्याने इंदिरानगरात हळहळव्यक्त केली जात आहे. गुरुवारीच सुषमाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.Newsjagar
आत्महत्या करण्यापूर्वी सुषमाने घरातील कपाटावर खडूने स्वखुशीने जात आहे, असे लिहून ठेवले आहे.
पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.