मानसिक तणावाखाली केली आत्महत्या

श्री.भुवन भोंदे,  प्रतिनिधी , न्युज जागर 

देसाईगंज,दि.१६/०५/२०२३

सावंगी येथील भगवान रामजी मेश्राम (४०) याने दि. १६/०५/२०२३ मंगळवार ला दुपारी १२ वजताच्या सुमारास राहत्या घरात लाखडी फाट्याला नाईलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी आरती भगवान मेश्राम यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मानसीक संतुलन ठीक नसल्याने आत्महत्या केली असे घरच्यांनी सांगितल्या प्रमाणे देसाईगंज पोलीस तपास करीत आहेत. देसाईगंज पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती नुसार भगवान रामजी मेश्राम गेल्या १ महिन्या पासून घराबाहेर होते. मानसिक तणावाखाली असायचा त्यातूनच घरातील मंडळी शेतात गेले बघून संधीचा फायदा घेत भगवान मेश्राम यांनी घरातीलच लाखंडी फाट्याला नाईलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.परंतु घरातीलच लोकांच्या लक्षात येताच आरडा ओरडा करताच शेजाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत.news jagar