चामोर्शी पोलीस निरीक्षक खांडवे वर तडकाफडकी निलंबनाची कार्यवाही,न्यायाधीशांशी वाद करणे नडले

pi khandve suspended
pi khandve suspended

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी न्युज  जागर

गडचिरोली , दि.२५/०५/२०२३

चामोर्शी बाजार समिती निवडणुकीत  २० एप्रिल रोजी मारहाण केल्याचा आरोप गण्यारपवार यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे वर केला होता. मारहाणीत गण्यारपवार यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. दरम्यान, पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याच्यावर गुन्हा नोंदविण्यासह बडतर्फीच्या कारवाईसाठी चामोर्शीत आंदोलन झाले होते.

त्यानंतर गण्यारपवारांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत २० मे रोजी पो. नि. राजेश खांडवे वर कलम २९४, ३२४, ३२६, ३४२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.  Newsjagar 

दरम्यान २५ मे रोजी सकाळी पो.नि. खांडवे हे न्या. मेश्राम यांच्या निवासस्थानी गेले. गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यावरुन खांडवे यांनी न्या. मेश्राम यांच्याशी हुज्जत घालून गैरवर्तन केले ,  न्या. मेश्राम यांनी ही बाब पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना कळवली.

घडल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने स्वतः खातरजमा केली. उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठांना ही बाब कळविली. पो.नि. खांडवे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले, त्यानंतर त्यांच्याविरुध्द चामोर्शी ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला. यातून बेशिस्त अधिकाऱ्यांना योग्य तो धडा मिळाला आहे.