आष्टीत २५ वर्षीय युवकाची आत्महत्या

suicide-at-aashti
suicide-at-aashti

श्री.अमित साखरे ,गडचिरोली  प्रतिनिधी,न्यूज जागर

आष्टी ,दि. २६/०५/२०२३

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील रोहीत विनायक बावणे वय २५  तरुणाने आत्महत्या केल्याचे आज दि २६ ऑगष्ट ला दुपारी दोन उघडकीस आली. suicide-at-aashti

मृतकाणे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली मयताची नातलग कांचन मांडवगडे हि रोहीत च्या घराकडे गेली तेव्हा तिला रोहीत फाशी लागलेल्या स्थीतीत दिसून आला लागलीच तिने आपल्या कुटुंबातील लोकांना माहिती दिली त्यावरुन त्यांचे भाऊ अर्पित बावणे यांनी त्याला खाली उतरून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. Newsjagar

आष्टी पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले व मृतकास शवविच्छेदन करण्यासाठी शवागारात नेले शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला,  अधीक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कु. कांबळे त्यांचे सहकारी करीत आहेत.