२४ तासात उलगडले अपहरणाचे कोडे , ३ आरोपी ताब्यात , पोलिसांची जबरदस्त कामगिरी

 

चंद्रपुर :- दि.15/8 /22 रोजी तुकूम चंद्रपूर येथून दोन इसमांची दिवसा दुपार दरम्यान खंडणीचा उद्देशाने अपहरण करण्यात आले होते. यातील आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवून फिर्यादी व त्याचा मित्र यांना गाडीत बसवून नागपूर येथील मोमीनपुरा परीसरात घेवून गेले.  फिर्यादीचा मित्राने संधी पाहून गाडीचा लॉक काढून जोर जोऱ्यात बचाव बचाव असे ओरडल्याने तेथील लोक व परिसरातील पोलीस तेथे आल्याने आरोपी इसम पळून गेले. त्यानंतर   नागपूर पोलीस यांनी सदर घटनेची सुरूवात पोस्टे दुर्गापूर जि. चंद्रपूर येथे झाल्याने फिर्यादी व त्याचा मित्र यास पो स्टे दुर्गापूर येथे घेवून आल्याने दि.16/08/22 रोजी रात्रो दरम्यान फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. दुर्गापूर येथे अप. क्र. 136/ 2022 कलम 384, 385, 364(A), 120 (ब), 143, 147, 149 भादवी सहकलम 4, 25 आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांची जबरदस्त कामगिरी

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये पो. नि. बाळसाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी लागलीच सपोनि बोबडे, स.पो नि कापडे, पोउपनि कावळे यांचे पथक तयार करून आरोपीचे माग घेण्याकरीता मार्गदर्शन करून आदेशीत केले.

गुन्हयातील आरोपींचा नविन मोबाईल नंबर प्राप्त करून सायबर सेलचे मार्फतीने तांत्रीक तपास करून गुप्त माहितीच्या आधारे घुग्घुस येथील ईसम नामे अमित चमन सारीकेक वय 30 वर्ष रा घुग्घुस हा आरोपींचे संपर्कात असल्याबाबत माहिती वरून घुग्घुस येथे गेले असता सदर इसमास अधिक विचारपुस करून त्याने यातील तीन आरोपी मोहम्मद सरताज अब्दुल हाफिज वय 36 वर्ष रा बिनबा गेट रहमतनगर चंद्रपुर, शेख नुर शेख ईस्माईल उर्फ रशीद वय 38 वर्ष रा नालसाहब रोड मोमिनपुरा नागपुर, अजय पुनमलाल गौर वय 35 वर्ष रा हसापुरी छोटी खदान नागपुर यांना त्याने घुग्घुस येथील द-गेट रेस्टॉरन्ट अॅन्ड लॉज येथे रूमवर थांबले असल्याचे माहिती दिल्यावर सदर लॉजवर गेले असता तिन्ही तीन्ही आरोपी काहि वेळेपूर्वी एका पांढऱ्या रंगाची होन्डाई केटा गाडी क्र . एमएच 48 एसि 8447 ने पसार झाल्याचे कळताच त्यांचा पाठलाग करत असतांना सदर वाहन गडचांदूर मार्गे जात असल्याची खात्रीशीर खबर मिळाल्याने पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे आदेशान्वये SDPO नंदनवार चंद्रपुर व SDPO नाईक गडचांदुर यांनी सबंधीत पो. स्टे हद्दीत नाकाबंदी लावली. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक सदर वाहनाचा पाठलाग करीत जात असता. पो.स्टे. कोरपना ठाणेदार याचे संम्पर्कात राहून माहिती देत असता सदर वाहन पो.स्टे. कोरपणा हददीत नाकांबदी दरम्यान पोस्टे कोरपणा येथील पोलीस स्टाफने गाडी क्र . एमएच 48 एसि 8447 हि थांबवीली व त्यांचा पाठलाग करत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक ने आरोपीना पकडले.

सदर गुन्हयातील तीन्ही आरोपी व गुन्हयातील गाडी ताब्यात घेवुन पोस्टें दुर्गापुर यांचे ताब्यात देण्यात आले.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अरवींद साळवे, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शेखर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पो उप नि अतुल कावळे, पो.हवा. संजय आतकूलवार, ना पो कॉ संतोष येलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे यांनी केली असुन,

पुढील तपास पो.स्टे. दुर्गापूर येथील पोलीस अधिकारी हे करीत आहे.