गडीसूर्ला येथे नवरत्न स्पर्धा संपन्न

गडीसूर्ला येथे नवरत्न स्पर्धा संपन्न

मुल तालुका प्रतीनिधी
मूल तालुकास्तरिय नवरत्न स्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसूर्ला येथे दिनांक ३डिसेंबर २०२५ला संपन्न झाल्या.
विद्यार्थ्यांच्या प्रतिभेस प्रेरणा देणाऱ्या वकतृत्व ,लेखन, कथाकथन, चित्रकला ई. नऊ स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत सात केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक गटातील एकूण126 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन सरपंच शारदाताई येनुरकर यांच्याहस्ते झाले.
तर अध्यक्ष श्री विनोद कावळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. वर्षाताई पिपरे गट शिक्षण अधिकारी यांनी केले.
विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये सतत प्रयत्न करीत राहणे आवश्यक आहे असे सांगितले.
रोजच्या परीपाठातून सातत्याने तयारी केल्यास यश मिळतेच असे सांगितले.
या स्पर्धेत बोंडाळा बुजरूक या शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवले त्याचप्रमाणें
राजोली,नवेगाव, चांदापुर इ.शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
गडीसूर्ला येथील अर्णव अजय राऊत यानी बुद्धिमापन स्पर्धेत सातत्याने तीन वर्ष तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत अनोखी हॅटट्रिक साधली .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुरेश टिकले, प्रशांत कवासे नवनीत कंदालवार, विजय दुधे, श्रीगुरवार, चौधरी यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातव्या वर्गाचेविद्यार्थी केतन चंदणखेडे व आरुषी आवळे यांनी केले तर आभार टिकले सर यांनी मानले.