कृषी विद्यार्थीनी नी मुरखळा (चक) येथील शेतकऱ्यानं दिले बोर्डो पेस्ट (मलम) तयार करण्याचे धडे

.

तालुका प्रतिनिधी न्युज  जागर 

केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी अंतर्गत ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेतील विद्यार्थ्या तर्फे मुरखळा(चक) येथे बोर्डो पेस्ट तयार करण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले .सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य कदम तसेच महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक छबिल दुधबळे, प्रा.उत्तम चरडे, प्रा. उषा गजभिये, यांचे मार्गदर्शन लाभले .कृषी विद्यार्थिनी प्रतिक्षा कापगते,अंकिता लाडे आणि अंकिता लोढे यांनी सदर प्रात्यक्षिक केले.

 

चुना, मोरचूद व पाण्याच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाला बोर्डो पेस्ट (मलम) असे म्हणतात. हे मिश्रण प्रभावी बुरशीनाशक असून, वेगवेगळ्या तीव्रतेच्या बोर्डो मिश्रणाचा फवारणी व झाडाच्या बुंध्याला लावण्याकरिता वापर केला जातो. वर्षातून कमीत कमी दोन वेळेस बुंध्यांना बोर्डो पेस्ट(मलम) लावावी.

बुंध्याचे बोर्डो पेस्ट वाळल्यानंतर खोडास निळसर आकाशी रंग येतो. बोर्डो पेस्ट व बोर्डो मिश्रण तयार केल्यावर ताबडतोब वापरावे. जास्त कालावधी झाल्यास त्याचा परिणाम होत नाही.

बोर्डो पेस्टचा वापर:

पावसाळा सुरु झाल्यावर बोर्डो मलम पावसाच्या पाण्यामध्ये विरघळून बुंध्याशी गेल्याने मूळाशी असलेल्या रोगकारक बुरशीचा नाश होतो.