वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अरुण बारसागडे

उपसंपादक न्यूज जागर 

नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अरुण हनुमान बारसागडे यांची ग्रामसभेत निवड प्रक्रिया करून अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. सदर ग्रामसभांमध्ये प्रथमता 21 सदस्यांची निवड करण्यात आली. 21 सदस्यांमधून अध्यक्ष पदाकरिता चार नावे घेण्यात आली. दोन नावे मागे घेतल्याने अरुण बारसागडे व यशवंत कायरकर यांचे अध्यक्ष पदाकरिता समोर होते. अरुण बारसागडे यांना अध्यक्ष पदाकरिता तेरा सदस्यांनी पसंती दर्शविल्याने वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी घोषित करण्यात आली. समिती सदस्य म्हणून यशवंत कायरकर, सुनील सहारे, गिरिधर निकुरे, हितेश मुंगमोडे, महेश बोरकर, राजु निकुरे, प्रशांत सहारे, प्रमोद ठिकरे, गुरुदास राऊत, दिवाकर ठिकरे, विकास बोरकर, प्रतिष्कार बोरकर, विजय सहारे, सुरेश निकुरे, मुखरू मांठरे, रमाकांत ठिकरे, टिकाराम बोरकर, सोमेश्वर निकुरे, आनंद कलेस्पोर आदिवासी निवड करण्यात आली. अरुण बारसागडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपसरपंच प्रवीण खोब्रागडे, सरपंच रवींद्र निकुरे, ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर सहारे, कैलास निकुरे, अभिनंदन केले