सोन्याची चोरी करणाऱ्या “फेसबुक फ्रेड” ला भंडारा येथून अटक

श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर 

गुन्हे शोध पथकाची कारवाई
कोठारीतील २४ तोळे चोरीचा प्रकार

बल्लारपूर  तालुक्यातील पो.स्टे कोठारी हद्दीतील एका ६७ वर्षीय विधवा महिलेशी फेसबुकचे माध्यमातुन फेक आयडी वरुन ओळख बनबुन तीचे बरोबर मैत्री करून विश्वास संपादन करुन तीचे राहते घरी मुक्काम करून सकाळी सदर महिला मॉर्निंग वाकला गेल्या नंतर तिचे घरातून २४.७०० तोळे सोन्याचे दागीने चोरी करुन फेसबुक फ्रेंड पसार झाला.या प्रकाराबाबत कोठारी पोलीस स्टेशनला अप. क्र. 138 / 22 कलम 380 भा.द.वी. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे गांभिर्य पाहून मा. पोलीस अधिक्षक अरवींद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सदर गुन्हा उघड करन्याचे आदेश केले. त्यावरून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे यांचे पथक गठीत केले. पो. नि. बाळासाहेब खाडे यांनी तांत्रीक तपास करून सदर आरोपी  बाबत त्याचे ठावठिकाण्याची माहिती प्राप्त केली. त्यानुसार सदर पथकाला भंडारा येथे रवाना करण्यात आले. सदर पथकाने तांत्रीक मदत घेवून सदर आरोपीला भंडारा येथून ताब्यात घेतले. सदर आरोपीताचे खरे नाव सोहम वासनीक रा. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा असे आहे. व तो एका कॉलेज मध्ये प्राध्यापक आहे. सदर आरोपीकडून गुन्हयातील व अतिरीक्त असे अंदाजे २९० ग्रॅम सोन्याचे दागीने व दोन मोबाईल असा एकुन १२,०३,००० /- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे. त्याने फसवणूक केलेल्या यवतमाळ, नागपूर, भंडारा येथील महिलांना संम्पर्क साधून माहिती दिली आहे. सदर आरोपीकडे चौकशी केली असता त्याने त्याची सुमित बोरकर या फेक नावाने आयडी बनविली आहे व सदर आयडी मार्फत तो महिलांना जिवनसाथी मॅट्रोमणी व फेसबुकवर संम्पर्क करून मैत्री करतो. त्यांना त्याची पत्नी मयत झालेली असून त्याला एक लहान मुलगी असल्याचे सांगतो सदर लहान मुलीचा फोटो हा देखील दुसन्या मुलीचा ठेवलेला आहे. तसेच तो महिलांना एम.बी.बी.एस., एम. डी. स्त्रीरोग तज्ञ असल्याचे सांगून तसे त्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला या नावाने आयडी कार्ड व त्यावर दुसऱ्या इसमाचा फोटो लावलेला आहे. तसेच सुमिन बोरकर, वैद्यकीय अधिकारी, अकोला या नावाची १,४४,००० /- रू. ची पगार पावती बनवून महिलांना पाठवितो व लग्न करावयाचे असे सांगून विश्वास संपादन करून मैत्री करतो व त्यांचे घरी जावून काही अडचणी सांगून पैसे व दागीन्यांची मागणी करतो. नाही दिल्यास चोरी करतो. सदरची यशस्वी कामगीरी मा. श्री. अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पो. नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, नापोशि नितेश महात्मे, जमिर पठाण, अनुप डांगे, नितेश महात्मे, पोशि प्रसाद धुलगंडे, मयुर येरणे, प्रमोद कोटनाके यांनी केली.