चामोर्शी तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
चामोर्शी :- पंचायत समिती चामोर्शी व केंद्र चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या कृषक हॉयस्कूल येथे ५ सप्टेंबर रोजी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन उपक्रमातून स्वयं स्फ़ुर्तीने विद्यार्थी शिक्षक बनून शालेय प्रशासन चांगल्या पद्धतीने जबाबदारी सांभाळल्याने त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला
कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी कृषक सुधार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रावण दूधबावरे हे होते, यावेळीमुख्याध्यापक अरविंद भांडेकर शिक्षक मोरेश्वर गडकर अविनाश भांडेकर गिरीश मुंजूमकर लोमेश्वर पिपरे लोमेश बुरांडे दिलीप भांडेकर मारोती दिकोडावार दिलीप लटारे आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक अरविद भाडेकर यांनी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा करतात याबद्दलची पाश्वभूमी तसेच सर्व महान व्यक्तीचे गुण ,कर्तृत्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून आपल्या ज्ञानात अधिक भर घालावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्रावण दुधबावरे यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले स्वयंशासनात निलम कोसमाशिले , सुरज कोसमशिले , माई चिचघरे , समृद्धी कोठारे , पोर्णिमा नवले या विद्यार्थ्याना शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले . तर सर्व सहभागी विद्यार्थ्याना भेट म्हणून पेन देण्यात आली . कार्यक्रमाचे संचालन शिक्षक संजय कुनघाडकर तर आभार शिक्षिका जासुदा जनबंधू यांनी मानले.कार्यक्रमाला विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते