प्रेसनोट
चामोर्शी – नगरपंचायत चामोर्शी अंतर्गत घरकुलाचा प्रश्न मार्गी लागला असून अखीव पत्रिका व गावठाण ची अट रद्द करून तीन वर्षाच्या घर टॅक्स पावतीच्या आधारे घरकुलाचा लाभ चामोर्शी व लालडोंगरी वासियांना मिळणार अशी माहिती नगरसेवक आशिष पिपरे यांनी आज दि.6 सप्टेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आखीव पत्रिका व गावठाण प्रमाणपत्राच्या जाचकटीमुळे अनेक गरीब पात्र लाभार्थी व लालडोंगरी वासिय जनता घरकुलापासून वंचित होती हा प्रश्न वारंवार जिल्हाधिकारी,आमदार, खासदार व मुख्यमंत्री महोदयाकडे लावून धरली शेवटी मंत्रालयात जाऊन आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदणे देहुन पाठपुरावा केला असता व खासदार अशोकजी नेते यांनी मंत्रालयात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन विशेष बैठक लावून सदर प्रश्न सोडवण्याची विनंती केली. यावेळी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने दि.२ सप्टेंबरला शासन परिपत्रक काढून तात्काळ आदेश पारित केला. यामुळे सर्वसामान्य व पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ होईल व चामोर्शी शहर ग्रामपंचायत मधून नगरपंचायत मध्ये रूपांतरित झाल्यापासून शहर विकासापासून कोसो दूर आहे व शहराचा नियोजनबद्ध विकास होणे अपेक्षित होते परंतु आज तागायत ते पाहायला मिळत नाही. नुकतेच चामोशी नगरपंचायतीत नव्याने निवडणूक होऊन नवीन कार्यकारणी गटित झालेली आहे. या कार्यकारणी कडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत मात्र यातील अनेक विषय नगरपंचायत यांच्या कार्यकक्षेबाहेरचे आहेत. जिथे नगरपंचायत कार्यालय आहे ती जागा सुद्धा नगरपंचायतच्या मालकीची नाही ही हास्यास्पद बाब आहे.त्यामुळे शहरातील अनेक विषय प्रलंबित आहे या सर्व विषयावर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन सदर विषयी सोडविण्यासाठी मागणी केली आहे त्यावर त्यांनी आश्वासन दिले की गडचिरोली जिल्ह्याला पालकमंत्री मिळाल्यानंतर सर्व विषय मार्गी लावू असे आश्वासित केल्याचे नगरसेवक आशिष पिंपरी यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला रमेश अधिकारी आदी उपस्थित होते.