चामोर्शी तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
40 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
चामोर्शी : – शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक विद्यालय आमगाव ( म) येथे डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन ( स्वयंशासन दिन ) साजरा करण्यात आला यात तब्बल 40 विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शिक्षकांना तासिका घेण्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी विद्यार्थी शिक्षकांपैकी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई आदी पद विद्यार्थ्यांनी भूषवले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्याचे निरीक्षण करण्यात आले व उत्कृष्ट शिक्षक – शिक्षिकेची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना पुढील कार्यक्रमाप्रसंगी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येईल अशी ग्वाही कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आली.
यावेळी निरीक्षक म्हणून प्रकाश निमकर, अभिषेक ढोंगे , चंदू सातपुते, नरेंद्र चिटमलवार, सुरेश केळझरकर आदींनी आपले कार्य पार पाडले तर ग्रुप लीडर सुवेंदू मंडल , रुचिता बंडावार, कविता पुण्यपकर तसेच सुनील वांढरे, पुरुषोत्तम गुरूनुले , अनिल निमजे ,निशा रामगुंडे, गजानन बारसागडे यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्व विद्यार्थी – शिक्षकांचे प्राचार्य अनिल गांगरेडीवार तसेच शिक्षक वर्गांनी कौतुक केले व भविष्यात विद्यार्थांनी विविध कार्यक्षेत्रात आपली चांगली कामगिरी करावी व आपल्या घरच्यांचा व समाजाचा मान उंचवावा यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात भाषणांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.