सावली तालुका प्रतिनिधी
दिनांक ७/९/२०२२ रोजी विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा २०२२ घेण्यात आली.या नाट्योत्सव स्पर्धांमध्ये तालुक्यातील एकूण १५ सहभागी शाळेमधून रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली या शाळेतील १९७० च्या पृथ्वीवरील जिवनमान आणि सध्याच्या २०२२ मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातील मानवी जिवनशैलीतील बदल यातील तफावत दाखवून १९७० च्या पृथ्वीवरील सजीवांचे जिवन कसे सूखी,समाधानी,आणि समृद्ध होते हे दाखवून प्रथम क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे मानवी जिवन समृद्ध करण्यासाठी विश्वातील सर्व घटकांचे समाजप्रबोधन केले.
या सादरीकरकरीता मार्गदर्शन करणारे शिक्षक जी.एन . मेश्राम, विज्ञान शिक्षिका सौ.माया निमसटकर,कु.सी.एस.रायपूरे मॅडम,कु.एस.एस.रेब्बावार,सौ.व्हि.डी मेटांगळे मॅडम, ए.पी.दुधे यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेला हे यश संपादन करता आले.
शाळेचे मुख्याध्यापक एन.एल.शेंडे, पर्यवेक्षक एम.डी.लाकडे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक करून अभिनंदन केले.